माणूस चावल्याने कुत्रा हॉस्पीटलमध्ये दाखल
वॉशिंग्टन, दि. १२ (एमएमसी न्युज नेटवर्क) : माणसाला कुत्रा चावल्याची बातमी तुम्ही वाचली असेल, पण कुत्र्याला माणूस चावल्याचे कधी वाचले आहे का? खरोखरच अशी एक घटना अमेरिकेत घडली आहे. पोलीसांपासून आणि दंडापासून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने चक्क पोलीसांच्या कुत्र्याला चावा घेतला आहे. तेही एकदा नव्हे तर खूप वेळा. यामुळे कुत्र्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले आहे. होता. दारू पिऊन तो गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला पकडलं आणि गाडीत बसायला सांगितलं. पण तो काही ऐकत नव्हता. गाडीत बसायलाच तो तयार नव्हता
डेलावेअरमध्ये घडलेली ही घटना. जमाल विंग असं या आरोपीचं नाव आहे. 47 वर्षांचा जमाल गाडी चालवताना नशेत होता. दारू पिऊन तो गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला पकडलं आणि गाडीत बसायला सांगितलं. पण तो काही ऐकत नव्हता. गाडीत बसायलाच तो तयार नव्हता
अखेर पोलिसांनी आपल्या प्रशिक्षित श्वानाला समोर आणलं. जेणेकरून त्याला घाबरून तरी जमाल गाडीत बसेल.मात्र श्वानाने हालचाल करण्याआधीच जमालने तब्बल 12 वेळा श्वानाचा चावा घेतला. यामुळे श्वान गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. कसंबसं पोलिसांनी जमालला कंट्रोल केलं. त्यालाही दुखापत झाली. त्यालाही रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
SL/KA/SL
12 July 2023