पाणी प्रश्नावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली

 पाणी प्रश्नावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली

सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगलीसाठी कृष्णेचे पाणी सोडण्यावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यात जुंपली असून कृष्णेच्या पाण्यासाठी मी माझी खासदारकी पणाला लावणार आहे, केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची मी तक्रार करणार आहे असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे.

तिथे जर का तोडगा निघाला नाही तर मी माझी खासदारकी पणा लावून खासदारकीचा राजीनामा देणार आहे असे सांगली मध्ये संजय काका पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमच्या हक्काचं पाणी देण्यामध्ये साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे घाणेरडे राजकारण करत आहेत आणि पाणी देऊ देत नाहीत, असा आरोप करत खासदार संजय काका पाटील पुढे म्हणाले, कोयना धरण कोणाच्या मालकीचे झाले आहे का…? कोयना धरणाच्या सातबारा नाव शंभूराजे देसाई यांचे लावले का..? पाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील जनतेला वेठीस जाणारे हे शंभूराजे देसाई हे कोण? असा सवाल ही सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी उपस्थित केला. The Mahayuti leaders clashed over the water issue

शंभूराज देसाई यांनी खोडसाळपणा केला आहे. अधिकाऱ्यांना वेडेवाकडे बोलतात अडमोठेपणा करत आहेत. वाटपाच्या नियोजनाच्या बाबतीत असणाऱ्या कागदावर शंभूराजे देसाई हे सही करत नाहीत, अशी टीका ही खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे. यानंतर देसाई काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ML/KA/PGB
25 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *