महाविकास आघाडीने राज्यात खोटा प्रचाराचा फुगा फुगवला

 महाविकास आघाडीने राज्यात खोटा प्रचाराचा फुगा फुगवला

नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीने राज्यात खोटा प्रचाराचा फुगा फुगवला. संविधान बदलाची खोटी चर्चा पेरली, आदिवासी समाजाला भीती दाखवली त्यामुळेच आम्हाला अपेक्षित यश मिळू शकले नाही अशी प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली, नागपुर विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते..

देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहे,सहाजिकच त्यांना निकालानंतर वाईट वाटणे हे स्वाभाविक आहे. गेल्या दहा वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन जनतेच्या हिताचे काम केलेले आहे. तरी जनतेने भाजपला नाकारले त्यामुळे त्यांना वाईट वाटले आहे. पण आम्ही केंद्रीय नेतृत्वाला विनंती केलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय अमान्य करावे अशी मागणी केल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

ML/ML/SL
6 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *