मुंबईनजिक उभारली जाणार देशातील सर्वाधीक लांबीची भिंत
मुंबई, दि. २४ : पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेले वाढवण बंदर हे देशातील सर्वाधिक नैसर्गिक खोली उपलब्ध असलेले बंदर आहे. वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या वाढवण बंदरासाठी समुद्रात भिंत बांधली जाणार आहे. ही भिंत देशातील सर्वाधीक लांबीची भिंत ठरणार आहे. वाढवण बंदर हे डहाणूजवळ बांधण्यात येत आहे. 12 किमी रेल्वे. 34 किमी रस्ते कनेक्टिव्हिटीसह 6,100 एकर भराव टाकून हे बंदर मुंबई-अहमदाबाद, जेएनपीटी फ्रेट कॉरिडॉर, जेएनपीए- दिल्ली मार्ग, समृद्धीला जोडणार आहे.
वाढवण पोर्ट परिसरात समुद्राच्या लाटा रोखण्यासाठी आणि संरचनात्मक ढाचा मजबूत होण्यासाठी खोल समुद्रात ही भिंत बांधली जाणार आहे. देशातील सर्वाधिक लांबीची ही भिंत असून 10.74 किमीची भिंत असणार आहे. ही भिंत बांधण्यासाठी चार मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या कंपन्यांच्या तांत्रिक मुल्यांकनानंतरच आर्थिक निविदा उघडल्या जाणार आहेत. या निविदा ईपीसी मॉडेलवर अधारित असणार आहेत.
वाढवण बंदर हे मुंबईच्या उत्तरेकडील पालघर जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनारी आहे. या बंदरामुळं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील जागतिक व्यापार आणि मालवाहतूक सुलभ होणार आहे. ज्यामुळं कोलंबो आणि सिंगापूरसारख्या आंतरराष्ट्रीय बंदरांवरील अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. हे बंदर एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून 2029पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. वाढवण येथील समुद्रात नैसर्गिकरीत्या 20 मीटरपेक्षा जास्त खोली असल्यामुळे, येथे अजस्त्र कंटेनर जहाजे (mega container ships) सहजपणे ये-जा करू शकतील, जे इतर अनेक भारतीय बंदरांमध्ये शक्य नाही.
The longest wall in the country will be built near Mumbai
SL/ML/SL