ट्रम्प- पुतिन यांची बहुप्रतिक्षित भेट, पुतिन यांनी सर्वांसमक्ष तोडला अमेरिकी शिष्टाचार

अलास्का, दि. १६ : जागतिक स्तरावर सर्वच माध्यमांचं लक्ष या एका बहुप्रतिक्षित भेटीकडे लागलं होतं. अलास्काच्या एंकोरेज इथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची काल भेट झाली आणि या बैठकीतून पश्चिमी रशियातील तणावावर काही अंशी तोडगा निघाल्याचंही म्हटलं गेलं. शुक्रवारी साधारण तीन तासांसाठी पुतिन आणि ट्रम्प यांच्याल मोठी शिखर बैठक आणि चर्चा झाली. ज्यानंतर या दोन्ही नेत्यांनी माध्यमांना संबोधित केलं. 2018 मध्येसुद्धा पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी होत साऱ्या जगाचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान, यावेळच्या भेटीची संधी साधत पुतिन यांनी इतिहास, भूगोल आणि अमेरिकेसह असणाऱ्या ‘शेजारी’ राष्ट्र धोरणांवर अधिक भर दिला. युक्रेनसोबतच्या युद्धबंदीसंदर्भातील अटींवर मात्र त्यांनी कोणत्याही स्वरुपातील स्पष्टोक्ती दिली नाही.
पुतिननी मोडला शिष्टाचार
अमेरिकी शिष्टाचारानुसार जेव्हा इतर कोणत्याही देशाचे राष्ट्रपती किंवा इतर कोणत्याही परदेशी नेत्याचं आपल्या देशात आगमन होत झालं असता (उच्च पदस्थ व्यक्ती अमेरिकेच्या पाहुण्यांपैकी एक असल्यानं) संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये यजमानपद भूषवणाऱ्या अमेरिकेच्याच राष्ट्राध्यक्षांनीच सर्वप्रथम माध्यमांसमोर बोलणं अपेक्षित असतं. मात्र पुतिन यांनी ही परंपरा खंडित केल्याचं शुक्रवारी पाहायला मिळालं.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी फक्त रशियन भाषेतच पत्रकार परिषदेची सुरूवात केली नाही, तर 2 मीटर दुरूनच ट्रम्प यांचं अभिवादन स्वीकारलं आणि म्हटलं, ‘आजचा दिवस चांगला जावो… प्रिय शेजारी. तुम्ही व्यवस्थित असाल अशी मी आशा करतो.’ इतक्यावरच पुतिन थांबले नाहीत, तर त्यांनी अलास्काच्या इतिहासावर उजेड टाकत हा भाग कधीकाळी रशियाचाही होता, जो सध्या अमेरिकेचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. अलास्काचा हा भाग अमेरिका आणि रशियाला ऐतिहासिक तत्त्वांवर एकत्र जोडणारा दुवा असून, ही दोन्ही राष्ट्र एकमेकांचे स्पर्धक नसून, ती एकत्र येत भागिदारीनं चांगलं काम करु शकतात असं सूचक विधान पुतिन यांनी केलं.