शिवसेना उबाठा ची यादी जाहीर , आघाडीत झाली बिघाडी

 शिवसेना उबाठा ची यादी जाहीर , आघाडीत झाली बिघाडी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्षाने आपले सतरा उमेदवार आज जाहीर केले असून त्यावर काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, हे आघाडी धर्माचे सरळ उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. तिकडे वंचित बहुजन आघाडी ने आपले उमेदवारही जाहीर करून टाकले आहेत.

शिवसेना उबाठा पक्षाच्या यादीत माजी मंत्री अनंत गीते , अरविंद सावंत , अनिल देसाई , राजन विचारे आदी सतरा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, मात्र सांगली , मुंबई उत्तर पश्र्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य मतदासंघांतील उमेदवारांबाबत काँग्रेसला तीव्र आक्षेप आहे. हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेसला हवे आहेत . सांगली साठी काँग्रेस नेत्यांनी थेट सोनिया गांधी यांच्या कडे धाव घेतली आहे.

जेव्हा काही जागांवर चर्चा सुरू आहे आणि आपण आघाडीत आहोत, तेव्हा आघाडी धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे, तर हे आघाडी धर्माचे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

उद्धवजींनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांचा बाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे असे माझे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली यादी जाहीर करत महा विकास आघाडीपासून फारकत घेतल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे, वंचितचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे, नागपूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देत मनोज जरांगे यांना सोबत घेण्याची तयारी दर्शविली आहे. The list of Shiv Sena Ubhata announced, there was a breakdown in the alliance

ML/ML/PGB
27 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *