आशिया खंडातील सर्वांत मोठे गणेश मंदीर

आशियातील सर्वात मोठे गणपती मंदिर गुजरातमध्ये आहे. अहमदाबादजवळ महेमदाबाद येथे वात्रक नदीच्या काठावर मोठे गणेश मंदिर आहे. या मंदिरालाही मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या नावावरून सिद्धिविनायक मंदिर असे नाव दिले आहे, पण हे मंदिर आकाराने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरापेक्षा खूप मोठे आहे. हे मंदिर फक्त भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात मोठे गणेश मंदिर आहे. येथे भगवान गणेशाची ५६ फूट उंच विशाल मूर्ती स्थापित आहे. मंदिराची भव्यता आणि विशालता पाहून प्रत्येकजण थक्क होतो.
6 लाख चौरस फूट परिसरात पसरलेले हे मंदिर जमिनीपासून २० फूट उंचीवर बांधले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली गणपतीची मूर्ती जमिनीपासून ५६ फूट उंच आहे. जर या मंदिराची तुलना मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराशी केली, तर महेमदाबादचे हे मंदिर त्याहून खूप मोठे आहे. याची स्थापत्यकला आणि भव्यता याला देशभरात एक वेगळी ओळख देतात. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात ७ मार्च २०११ रोजी झाली होती.