इथे भरलंय मुंबईतील इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंचं सर्वांत मोठं प्रदर्शन
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्ष अखेर आणि नवर्षाच्या स्वागता निमित्ताने बाजारात विविध वस्तूंचे सेल्स सुरु आहेत.
ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची भारतातील आघाडीची रिटेल चेन कंपनी विजय सेल्सनं आयआयसीएफ कन्झ्युमर एक्स्पोशी संयुक्त सहकार्यानं मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात भव्य इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन भरवलं आहे. ६० हजार चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या इलेक्ट्रॉनिक शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये टेक चाहत्यांना तब्बल १०० ब्रँड्सची उत्पादनं पाहण्याची व खरेदीची संधी आहे. २४ डिसेंबरपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन ६ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता यांनी मुंबईत होत असलेल्या या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘इंडिया इंटरनॅशनल कन्झ्युमर फेअरशी भागीदारी करून आम्ही ग्राहकांना अतुलनीय किंमतीत अत्याधुनिक टेक्नॉलॉजी-उत्पादनं प्रत्यक्ष बघून किफायतशीर दरात देत आहोत. या उत्पादनांवर आकर्षक सवलती आहेत. त्यामुळे स्वतःसाठी किंवा प्रियजनांसाठी खरेदी करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. या अनोख्या प्रदर्शनाला भेट देऊन व सरस ब्रँड्सची उत्पादनं खरेदी करून नव्या वर्षाचा आनंद द्विगुणित करावा, असं आवाहन गुप्ता यांनी केलं आहे.
टेक्नॉलॉजीची आवड असलेल्यांना हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात अॅपल, सॅमसंग, एलजी, सोनी, वनप्लस, बोट, हेयर, व्हर्लपूल, अँरास, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉरफी रिचर्ड्स, फिलिप्स, वंडरशेफ, एओ स्मिथ आणि इतर अनेक आघाडीच्या ब्रँड्सची नवी उत्पादनं आहेत.
अगदी अलीकडं लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्सपासून ते स्मार्ट किचन उपकरणं आणि प्रीमियम होम अॅप्लायन्सेसपर्यंत, सगळ्यांना आकर्षित करणारं असं काहीतरी या प्रदर्शनात आहे. इथं प्रत्येक मोठ्या ब्रँडचा स्वतःचा एक एक्सपिरीयन्स झोन आहे. उत्पादनं प्रत्यक्ष बघून उत्तम सौदा करण्यासाठी खरेदीदारांना मिळालेली ही उत्तम संधी आहे.
SL/ML/SL
26 Dec. 2024