मेट्रो कारडेपो मध्ये सरकारने केला जमीन घोटाळा

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील मेट्रो कारशेडच्या इंटिग्रेटेड योजनेत राज्य सरकारने जमिनीचा मोठा घोटाळा केला असून त्याची तक्रार आम्ही लोकायुक्त यांच्याकडे करणार आहोत असे आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील शिंदे-भाजपच्या बेकायदेशीर राजवटीतील मेट्रो कांजूर जमीन घोटाळा आणि रस्ते घोटाळयांला मुबंई महापालिकेने स्थगिती दिलीय.सत्याचा विजय झालाय, जे आम्ही बोलत होतो ते आज उघड झालंय असे ते म्हणाले.
कांजुरमार्गला मेट्रो 6 चा कारडेपो करणार आहेत ,आम्ही मेट्रो 6 मेट्रो 3 आणि 4 चा इंटिग्रेटेड कार डेपो करणार होतो. खोके सरकारने मेट्रो 3 चा कारडेपो आरे मध्ये नेला.यामध्ये आमचा कुठलाही इगो नव्हता.
आपण 4 डेपो एकत्र केले असते तर 4 जागा वेगळ्या कराव्या लागल्या नसत्या.
10 हजार कोटी यामध्ये वाचले असते .इंटिग्रेटेड कारडेपो करत असताना पैसे वाचले असते .
मात्र हे घटनाबाह्य मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत. फक्त कॉन्ट्रॅक्ट देण्याचा काम सरकार करत आहे असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. The land scam was done by the government in Metro Kardepo
दीड वर्ष हे सरकार चाललं, यामध्ये एवढे घोटाळे झाले.अध्यक्षांचा सुनावणी मध्ये टाइम पास सुरू आहे.निर्णय त्यांनी लवकर घ्यावा, आम्ही या सगळ्या घोटाळ्याविरोधात लोकायुक्ता कडे जाणार आहोत असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ML/KA/PGB
13 Oct 2023