नरिमन पॉईंट ते विरार प्रवास होणार ३५ मिनिटांत

 नरिमन पॉईंट ते विरार प्रवास होणार ३५ मिनिटांत

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील नरिमन पॉईंट ते कोस्टल रोडचं बांधकाम पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढवलं जाईल, जो मुंबई महानगर प्रदेशाचा भाग आहे. हे नरिमन पॉईंट ते विरारपर्यंतचं कोस्टल रोडचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते विरार हे १ तास २० मिनिटांचं अंतर अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पार करता येईल, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोड विस्ताराबाबत केली आहे. फडणवीसांनी सांगितलं, की जपान सरकार कोस्टल रोड पुढे विरारपर्यंत वाढवण्यासाठी ५४००० कोटी रुपये देणार आहे. तर दुसरीकडे वर्सोवा ते मढ लिंकपर्यंतचं टेंडर आधीच जारी करण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मढ ते उत्तान लिंकपर्यंतचं काम आता सुरू होणार असल्याची माहिती दिली. त्याशिवाय कोस्टल रोड हा मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील ८ लेनचा असणार असून तो २९.२ किमी लांबीचा वेगळा एक्स्प्रेस-वे आहे. हा एक्सप्रेस-वे दक्षिणेकडील मरीन लाइन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना एकत्र जोडतो.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *