या प्रख्यात कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी ओपन

 या प्रख्यात कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी ओपन

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आइडियाफोर्ज या भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन कंपनीचा आयपीओ (IdeaForge IPO) आज सोमवारी २६ जून रोजी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये २९ जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. आइडियाफोर्ज बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होणारी पहिली ड्रोन कंपनी असेल.

कर्जाची परतफेड करण्याव्यतिरिक्त आयपीओमधून उभारलेली रक्कम खेळत्या भांडवलासाठी वापरली जाईल. आइडियाफोर्ज ही फ्लोरिंट्री कॅपिटल पार्टनर्स-समर्थित कंपनी आहे. डिसेंबर २०२२ मध्ये ड्रोन इंडस्ट्री इनसाइट्सच्या अहवालानुसार, नागरी आणि संरक्षण अशा दोन्ही प्रकारच्या ड्रोनच्या बाबतीत ही जगातील सातवी सर्वात मोठी कंपनी आहे.

आयपीओद्वारे कंपनी ५६७ कोटी रुपये उभारणार असून यामध्ये नवीन शेअर्स जारी केले जातील. तसेच ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गतही शेअर्सची विक्री देखील केली जाईल. आयपीओ उघडण्यापूर्वी कंपनीने २३ अँकर गुंतवणूकदारांकडून २५४.८८ कोटी रुपये उभे केले आहेत. या आयपीओअंतर्गत २४० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय १० रुपये दर्शनी मूल्याचे ४८,६९,७१२ शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. आयपीओमध्ये शेअर्ससाठी ६३८-६७२ प्राइस बँड निश्चित केली असून यामध्ये २२ शेअर्सचा लॉट आहे. तसेच कर्मचार्‍यांना ३२ रुपयांची सूट मिळणार असून त्यांच्यासाठी १३,११२ शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

IPO म्हणजे काय?
IPO म्हणजे Initial Public Offering. एक खाजगी कंपनी ज्यावेळी पहिल्यांदा आपले भाग (shares) विक्रीस काढते त्यावेळी त्यास IPO असे संबोधले जाते. अशा खाजगी कंपन्या ज्या शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत, त्यांना थेट भाग (shares) विक्री करता येत नाहीत.

SL/KA/SL
26 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *