येवल्यात झाली घोडे बाजाराला सुरूवात
नाशिक दि १८ (एम एमसी न्यूज नेटवर्क): गेल्या 350 वर्षांपासून नवरात्रीच्या काळामध्ये दसऱ्याच्या काळात येवला बाजार समितीच्या आवारात घोड्यांचा सर्वात मोठा बाजार भरत असून त्याला काल सुरूवात झाली. येवला शहरात 350 वर्षाची परंपरा असलेला घोडेबाजार हा मंगळवारी भरत असतो. येवल्याचे संस्थापक राजे रघुजीबाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहारात भरवण्यास सुरुवात केली होती. नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या पहिल्या मंगळवार येतो त्या दिवशी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असतो.
या घोडेबाजारात राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे, घोडे शौकीन तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी- विक्रीसाठी दाखल होतात. चेन्नई, कर्नाटक, पंजाब, काठेवाडी, गुजराथ, पंजाब, माथेरान असो अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले आहेत. हा सर्वात मोठा नवरात्र उत्सवाच्या काळात भरणार घोड्याचा बाजार आहे.
ML/KA/SL
18 Oct. 2023