राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात
अकोला, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांमध्ये नोंद असणाऱ्या अकोला शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून 26 मार्च रोजी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तापमानामुळे नागरीक हैराण झाले आहेत.
अकोल्यात काही दिवसापासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून मार्च महिन्या अखेरीस तापमान 41.5 अंश सेल्सिअस पोहचले आहे, 26 मार्च रोजी वाशिम येथे 41.4 तर अमरावती 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर येथे 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून कालचे अकोल्यात नोंदवलेले 41.5 अंश सेल्सिअस तापमान हे राज्यात सर्वाधिक नोंदवल्या गेले आहे. आजचे तापमान हे 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. अकोल्यात दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे.
ML/ML/SL
27 March 2024