सत्ता संघर्षावरची सुनावणी आता पुढच्या वर्षात
दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सत्ता संघर्ष आणि सत्तापालट यावर दाखल याचिकांवरची सुनावणी आता पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे.The hearing on the power struggle is now next year
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.
यावर आज सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणे सुनावणी घेतली जाईल, असं स्पष्ट करत तारखेची घोषणा केली.
यानुसार या सर्व याचिकांवर पुढील महिन्यात १३ जानेवारी २०२३ रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होईल.
ML/KA/PGB
6 Dec .2022