निवडणूक चिन्हाबाबतची आता सुनावणी १२ डिसेंबर रोजी..!

 निवडणूक चिन्हाबाबतची आता सुनावणी १२ डिसेंबर रोजी..!

नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली शिवसेनेच्या शिंदे – ठाकरे गटाची निवडणूक चिन्हासंदर्भातली सुनावणी आता १२ डिसेंबरला होणार आहे.The hearing about the election symbol is now on December 12..!

येत्या ९ डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे त्यानंतर ही सुनावणी घेण्यात येईल.

एकनाथ शिंदे अर्थात बाळासाहेबांची शिवसेना आणि उध्दव ठाकरे अर्थात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटांचे पहिल्यांदाच समोरासमोर युक्तिवाद होणे अपेक्षित आहे.

यामुळे १२ डिसेंबरची तारीख ठाकरे आणि शिंदे गटासाठी खूप महत्वाची मानली जात असून कदाचित यानंतर शिवसेनेचे मूळ चिन्हं कोणाला मिळेल हे निश्चित होऊ शकते.

ML/KA/PGB
29 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *