टिम इंडीयाच्या मुख्य प्रशिक्षकाने दिला तडकाफडकी राजीनामा
नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड ( Graham Reid ) यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ओडीशामध्ये झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाकडून झालेल्या खराब कामगिरीमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. टीम इंडियाला या स्पर्धेत क्वार्टरफायनलमध्येही स्थान मिळवता आलं नाही. रीड यांनी भुवनेश्वरमध्ये हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.
रिड यांनी राजीनामा दिला असला तरीही त्यांना पुढील तीन महीने नोटीस पिरियड काम करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून हॉकी खेळाडू असलेले रीड यांच्या प्रशिक्षक पदाच्या काळात भारताने 41 वर्षांनंतर ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स रौप्य आणि एफआयएच प्रो लीग 2021-22 च्या सत्रामध्ये तिसरं स्थान पटकावलं होतं. रीड कोच असताना भारतीय टीमने 2019 मध्ये एफआयएच विश्व सिरीज फायनल्स जिंकली होती.
30 Jan. 2023