अवकाळी पावसाचा कहर; फळबागांसह शेतीचे नुकसान…
वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीमसह जिल्ह्यातील मालेगांव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात काल सायंकाळी तसेच रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
मंगरूळपीर तालुक्यातील हिसई, कंझरा, चांभई, मोहगव्हान, येडशी, शेलुबाजार परिसरात मोठ्याप्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे गहू,ज्वारी,उन्हाळी मूग,बीजवई कांदा, टोमॅटो सह भाजीपाला ,टरबूज, खरबूज, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हान शेतशिवारा मधील राजू चक्के यांच्या तीन एकर पपई बागेचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पपई पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे.
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात सोसाट्याच्या वारा आणि गारपीटीमुळे उपविभागिय पोलीस अधीकारी कार्यालयाची पडझड झाली असून कार्यालयाचे छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी गारांचा खच व पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात कार्यालयात जमा झाला होते. त्यामुळे पोलीस स्टेशन मधील काही महत्वाची कागदपत्रे भिजवून गेली आहेत. तर दुसरीकडे मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा येथील मदन मुखमले यांच्या घरावर वीज कोसळून घराचे बरेच नुकसान झाले आहे.
या घटनेत मनुष्यहानी झालेली नसून सर्व परिसरातील नागरिक सुखरूप आहेत. मात्र अवकाळी पावसाने शेती व फळबागांचे नुकसान झाल्याने तातडीने नुकसानीचे पंचानामे करण्याची मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे.The havoc of unseasonal rain; Damage to agriculture including orchards…
ML/KA/PGB
10 Apr. 2023