असंवेदनशीलतेचा कहर, ऑपरेशन थिएटरमध्ये प्रि-वेडींग फोटो शुट

 असंवेदनशीलतेचा कहर, ऑपरेशन थिएटरमध्ये प्रि-वेडींग फोटो शुट

बंगळूरु, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रि-वेडींग फोटोशूटच्या नावाखाली सध्या नियोजित वधू-वरांकडून काहीतरी हटके दाखवण्याच्या नादात थिल्लकरपणा करण्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांपासून सुरु आहेत. सोशल मिडियावर असे फोटो टाकून लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याठीही अनेकजण उत्सुक असतात. मात्र या व्यक्तिगत उपक्रमामुळे अति उत्साहाच्या भरात नियमभंग होत नाही ना याचेही भान राखणे आवश्यक आहे. असाच एक प्रि-वेडींग फोटोशूटच्या चमत्कारिक प्रकार कर्नाटकामध्ये झाला आहे. यामध्ये एक डॉक्टर आपल्या नियोजित डॉक्टर पत्नीसह चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये फोटोशुट करत असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर त्या डॉक्टला बडतर्फ करण्यात आले आहे.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील भरमसागर सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरला ऑपरेशन थिएटरमध्ये (OT) प्री-वेडिंग शूट केल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले. डॉक्टरने आपल्या होणाऱ्या पतीसोबत ओटीमध्ये बनावट शस्त्रक्रिया केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओटीमध्ये प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ बुधवारचा (7 जानेवारी) आहे. यामध्ये डॉक्टर आपल्या होणाऱ्या पतीसोबत बनावट ऑपरेशन करताना दिसला. यावेळी कॅमेरामन आणि तंत्रज्ञ हसत होते. पेशंट असल्याचे भासवणारी व्यक्तीही हसताना दिसते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी या घटनेवर डॉक्टरांना फटकारले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले – सरकारी रुग्णालये लोकांच्या काळजीसाठी आहेत आणि वैयक्तिक कामासाठी नाहीत. डॉक्टरांचा असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही.

आरोग्य मंत्री म्हणाले- ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट करणाऱ्या डॉक्टरला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागात कार्यरत सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेतील नियमांचे पालन करावे. दरम्यान चित्रदुर्गाचे जिल्हा आरोग्य अधिकारी रेणू प्रसाद यांनी सांगितले की, डॉक्टरची एक महिन्यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंगचे शूटिंग झाले होते ते सप्टेंबरपासून वापरात नाही. सध्या तेथे दुरुस्तीचे काम सुरू होते.

SL/KA/SL

10 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *