नवीन संसद भवनाचा दिमाखदार उद्धाटन सोहळा संपन्न

 नवीन संसद भवनाचा दिमाखदार उद्धाटन सोहळा संपन्न

नवी दिल्ली, २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहीलेल्या नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळ्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.पंतप्रधान१ मोदी सकाळी 7.30 वाजता संसदेत पोहोचले आणि त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यानंतर हवन झाले आणि सेंगोल स्वीकारत पीएम मोदींनी ऋषी-मुनींचे आशीर्वाद घेतले.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी हवन-पूजन सुरू झाले आहे. पूजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सभापती ओम बिर्ला उपस्थित होते. चेन्नईहून आलेल्या धर्मपुरम अधनम मठाच्या 21 संतांनी सेंगोल पंतप्रधान मोदींना सुपूर्द केले. पंतप्रधानांनी सेंगोलला दंडवत नमस्कार करून संतांचे आशीर्वाद घेतले.यानंतर पंतप्रधान मोदींनी मंत्रोच्चारात स्पीकरच्या खुर्चीजवळ सेंगोल स्थापित केले.संसदेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमयोगींचा पंतप्रधान मोदींनी गौरव केला. 20 विरोधी पक्षांनी संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे.

नवीन संसदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रुपरेषा

सकाळी 7 पासून पूजा आणि हवनाने कार्यक्रमाला सुरुवात
8:30 ते 9:30 दरम्यान लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीजवळ सेंगोल (राजदंड) स्थापना
सकाळी 9.30 वाजता संसदेच्या लॉबीमध्ये प्रार्थना सभा
12 वाजता संसदेच्या नवीन इमारतीशी संबंधित दोन लघुपट प्रदर्शन
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या संदेशाचे वाचन
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 1 वाजता 75 रुपयांचे विशेष नाणे आणि स्टॅम्प जारी करतील.
10 मिनिटांनी पंतप्रधान भाषण करतील आणि दुपारी 2.30 वाजता कार्यक्रम संपेल.


SL/KA/SL
28 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *