या राज्यात ८० ते १०० रु लिटर दराने सरकार करणार दूध खरेदी

 या राज्यात ८० ते १०० रु लिटर दराने सरकार करणार दूध खरेदी

शिमला, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिमाचल प्रदेश सरकारने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदीची बातमी दिली आहे. राज्य सरकारने म्हैस आणि गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता खरेदी दर ८०-१०० रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी राज्य सरकार कांगडा जिल्ह्यातील डगवार येथे २५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक दूध प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी केली.मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील सुमारे 90 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि पशुपालन आणि शेती यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे गरजेचे आहे. डगवार येथे प्लांटच्या उभारणीमुळे कांगडा,हमीरपूर,उना आणि चंबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल.

शिमला येथे झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सुखू यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (NDDB) सहकार्याने दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला जाईल. या प्लांटची क्षमता १ लाख लिटर ते ३ लाख लिटर इतकी असेल, त्यात चांगल्या दर्जाचे दुधाचे पदार्थही तयार करण्यात येणार आहेत.

एनडीडीबीचे अध्यक्ष मीनेश शाह यांनी सांगितले की, या मिशनसाठी ते हिमाचल प्रदेशला सर्वतोपरी मदत करतील. एनडीडीबी प्लँटच्या संचालनासाठी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विपणनासाठी स्वखर्चाने दोन सल्लागार देखील देतील. त्यामुळेच आतचा मुख्यतः पर्यंटनावर अवलबून असलेल्या हिमाचल प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला दुग्धोत्पादनाची साथ मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालक वर्ग अधिक आत्मनिर्भर होईल.

SL/KA/SL
20 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *