सरकारनेच थकवले शिक्षण विभागाचे रु ७२४१.३८ कोटी अनुदान
मुंबई, दि. 26 : मुंबई मनपाच्या शाळांच्या खर्चासाठी राज्य सरकार अनुदान देते. मात्र सरकारने शिक्षण विभागाचे तब्बल ७२४१.३८ कोटी रुपये थकविले आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहे. मात्र आजही महापालिका अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणासाठी आणि शाळातील कर्मचारी वर्गाच्या वेतनासाठी ७२४१.३८ कोटी इतकी रक्कम येणे बाकी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पातून ही बाब समोर आली आहे. सरकारच्या या अक्षम् दिरंगाईमुळे आधिच अडचणीत आलेल्या पालिकेच्या शाळा अधिकच क्षीण होत चालल्या आहेत.
राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेस ३१ मार्च २०२५ पर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या खर्चापोटी ५६५५.३० कोटी व माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी १५८६.०८ कोटी अशी एकूण ७२४१.३८ कोटी इतकी रक्कम येणे बाकी आहे. तर २०२६-२७ मध्ये प्राथमिक शाळांच्या खर्चापोटी अनुज्ञेय ५० टक्के अनुदान ६४३.८० कोटी राज्य सरकारकडून अपेक्षित आहेत.
SL/ML/SL