खारघर दुर्घटनेत सरकारचा दोष नाहीच , विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवी मुंबई येथील खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या चौदा श्री सदस्यांच्या मृत्यू बद्दल प्रश्नोत्तराच्या तासात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
या उत्तरा दरम्यान विरोधकांनी वारंवार आक्षेप घेतले , त्यानंतर गदारोळ झाला , विरोधक जागा सोडून पुढे आले त्यांनी घोषणा दिल्या. मंत्री अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरतात असा आक्षेप आधी बाळासाहेब थोरात यांनी घेतला होता. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी केली. गृहखात्याने याचे उत्तर द्यावे , चौकशी समितीला वारंवार मुदतवाढ का असा सवाल त्यांनी केला.The government is not to blame for the Kharghar tragedy, the opposition’s walkout
चौकशी समिती ने मुदतवाढ मागितली , त्यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा यासाठी मुदतवाढ दिली आहे असं मुनगंटीवार म्हणाले. कार्यक्रम ३०६ एकर क्षेत्रात झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मंडप घालणं शक्य नव्हते, तापमान ३४ डिग्री असेल असं हवामान खात्याने म्हटले होते मात्र त्या दिवशी ३८ डिग्री इतकं वाढलं , आम्ही सर्व चोख व्यवस्था केली होती, डॉक्टर , पाणी , वैद्यकीय मदत आदी सर्व व्यवस्था होत्या . मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी देखील व्यवस्थेबद्दल तक्रार केलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने देखील यावरची जनहित याचिका फेटाळली आहे असं मंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं.
ML/KA/PGB
20 July 2023