शासन आपल्या दारी अन् खर्चही सर्वसामान्यांच्या माथ्यावर

 शासन आपल्या दारी अन् खर्चही सर्वसामान्यांच्या माथ्यावर

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या काही दिवसात महाराष्ट्र शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम बीड जिल्ह्य़ातील परळी येथे होऊ घातलेला आहे मात्र शासनाच्या या कार्यक्रमावर केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावरून ‘शासन आपल्या दारी… खर्च देखील सर्व सामान्यांच्या माथ्यावरी…’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

परळी येथील नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी जवळपास २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार १०० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. साईड मंडपासाठी ६० लाख १४ हजार १४० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे तर इलेक्ट्रिक कामांसाठी ७९ लाख ८२ हजार ५१० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

१७ ऑगस्ट रोजी परळी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेला देखील भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. आता शासन आपल्या दारी उपक्रमासाठी देखील तोडीसतोड मंडप उभारण्याचे नियोजन आहे मात्र यंदा खर्च करदात्यांच्या खिशातून केला जाणार आहे.

ML/KA/SL

13 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *