जी-२० परिषदेपासून सुरु झालेली रोषणाई अद्यापही कायम
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अलीकडच्या काळात मुंबई महापालिकेने सुशोभीकरणाचा आणि रोषणाईचा धडाका लावला आहे. उड्डाणपूल, रस्त्यांवरील दिव्यांचे खांब तसेच चौपाट्या विद्युत रोषणाईने उजळून निघत आहेत. या झगमगासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. टीका होऊनही पालिका आपल्या निर्णयावर कायम आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
‘ए’ वॉर्डातील साधू टी.एल. वासवानी, जी.डी. सोमाणी मार्गावरील पदपथावर रोषणाई तसेच सुशोभीकरण व सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
या कामाकरिता अंदाजे २ कोटी २८ लाख १६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. याच वॉर्डातील साधू टी.एल. वासवानी मार्गावरील कुलाबा वूड्स गार्डनचा परिसर सुशोभित केला जाणार आहे. याही ठिकाणी पदपथ, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे यांच्याही सुशोभीकरणाची कामे केली जाणार असून, त्यासाठी १ कोटी ८१ लाख ६१ हजार खर्च अपेक्षित आहे. The glow that started with the G-20 summit is still there
ML/KA/PGB
18 Dec 2023