मुंबईतील गणेश मंडळाने काढला तब्बल ३६० कोटींचा विमा

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेली असताना मुंबईतील सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या GSB गणपती मंडळाने मोठ्या रक्कमेचा विमा काढण्याची प्रथा कायम ठेवत यावर्षी तब्बल ३६० कोटी ४० लाखांचा विमा काढला आहे. किंग सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाच्या या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, बाप्पावर असलेल्या दागिने आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंडळाच्या वतीने योग्य खबरदारी घेत योग्य पाऊले उचलली जातात.
जीएसबी गणपती पाच दिवसांचा असतो. या मंडळाचे यंदाचे ६९ वे वर्ष आहे. भक्तांमध्ये नवसाला पावणारा विश्वाचा राजा म्हणून हा बाप्पा प्रसिद्ध आहे. त्यामुळे या गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे. नवसाला पावल्याने आणि श्रद्धेने भाविक गणपती चरणी दागिने अर्पण करतात. तब्बल ६५ किलो हून अधिक सोन्याचे दागिने आणि २९५ किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने या बाप्पाला भाविकांनी आणि सेवादारांनी अर्पण केले आहेत.गणेश दर्शनासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंडळाने यंदा तब्बल ३६० कोटी ४० लाखांचा विमा काढला आहे.
SL/KA/SL
4 Sept. 2023