G-20 चा थाटमाट, सोन्या-चांदीच्या ताटवाट्यामध्ये पाहुण्यांना भोजन

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ९ व १० सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रगटाच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या बैठकीसाठी १९ देशांचे, तसेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधी भारतात येणार आहेत.यानिमित्ताने जगभरातील राष्ट्रप्रमुखांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याची संधी यजमान भारताला मिळणार आहे.परदेशी पाहुण्याच्या खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये खास पक्वानं वाढण्यासाठीची ताटं वाटीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या ताटवाट्यांमध्ये जेवण वाढलं जाणार आहे. यामध्ये त्यांना भारतीय संस्कृतीचं आणि वारश्याचं दर्शन घडणार आहे.या भांड्यांमध्ये देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या आकारातलं नक्षीकाम करण्यात आलं आहे.
या सोन्या-चांदीच्या भांड्यांवर जयपूर, उदयपूर, बनारस पासून कर्नाटकापर्यंत विविध प्रकारचं नक्षीकाम केलेलं आहे. जी २० साठी महाराजा थाळीच्या डिझाईनसोबतच दक्षिण भारतातलंही काही वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी आयरिस या कंपनीला १५ हजार भांड्यांची ऑर्डर देण्यात आली आहे.या भांड्यांचं वैशिष्ट्य असं की ही भांडी पूर्णपणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली आहे.
ही भांडी तयार करणाऱ्या आयरिस कंपनीचे मालक राजीव आणि त्यांच्या मुलाने सांगितलं की त्यांच्या तीन पिढ्या भांडी बनवण्याच्या कामामध्ये आहेत. या भांड्यांमध्ये संपूर्ण भारताची झलक दिसून येते. त्यांना हेतू परदेशी पाहुण्यांना जेवणाच्या टेबलावर संपूर्ण भारताची झलक दाखवणं हा आहे. त्यांच्या भांड्यांवर जयपूर, उदयपूर, बनारस पासून कर्नाटकापर्यंत विविध प्रकारचं नक्षीकाम केलेलं आहे. हे तयार करण्यासाठी त्यांना अनेक दिवस लागले. या भांड्यांचं वैशिष्ट्य असं की ही भांडी पूर्णपणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कंपनी ११ हॉटेल्समध्ये भांडी पाठवत आहे, ज्यामध्ये आयटीसी ताज हॉटेलचाही समावेश आहे. या आधी जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले होते, तेव्हा त्यांना इथल्या जेवणासोबतच भारतीय भांडीही खूप आवडली होती. त्यांनी काही विशिष्ट भांडी आपल्यासोबतही नेली होती.
SL/KA/SL
7 Sept. 2023