सियाचीन युद्धक्षेत्रावर नियुक्त झालेली ही आहे पहिली महिला अधिकारी
नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंंड बर्फांच्छादीत सियाचीन ही जगातील सर्वांत उंच आणि खडतर युद्धभूमी आहे. या अतिशय आव्हानात्मक अशा युद्धक्षेत्रावर आता पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची निवड झाली आहे.
महिला कॅप्टन शिवा थापा हीला 15 हजार, 632 फूट उंचीवर सियाचीन सिमेवर नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय लष्करातून अशी नेमणूक होणारी शिवा ही पहिली महिला अधिकारी ठरली आहे. हा मान मिळवल्याबद्दल गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवाचे विशेष कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मूळची राजस्थानमधील उदयपूरची रहिवासी असलेली शिवा 2021 मध्ये भारतीय सेनेच्या इंजिनिअरींग रेजिमेंटमध्ये रुजू झाली. त्याआधी तिने चेन्नई येथील Offices Training Academy मध्ये प्रशिक्षण घेतले.
लडाख क्षेत्रात येणारे सियाचीन वर्षभर बर्फाच्छादित असते. येथे वर्षभर तापमान -10 अंश सेल्सिअस राहत असून हिवाळ्यात या तापमानात -50 अंशांपर्यंत घट होते.
SL/KA/SL
4 Jan. 2023