मासिकपाळी दरम्यान विद्यार्थीनींना सुट्टीची सवलत देणारे देशातील पहिले विद्यापीठ
कोचीन, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने मासिक पाळी रजा मंजूर करण्याची घोषणा केली. मुलींना प्रत्येक सेमिस्टरमध्ये अनिवार्य ७५% उपस्थितीत २% सूट मिळेल. विद्यापीठात ८,००० विद्यार्थी आहेत, त्यापैकी निम्म्या मुली आहेत.
मुलींना ही सवलत देणारे सीयूएसएटी देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा नमिता जॉर्ज म्हणाल्या, विद्यापीठ व्यवस्थापनाने आमची मागणी कोणताही आक्षेप न घेता मान्य केली. हा आदेश पीएचडीसह सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींना लागू असेल.
दरम्यान विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना त्यांच्या मासिक पाळीत रजा मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
ब्रिटन, वेल्स, चीन, जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्पेन आणि झांबिया या देशांमध्ये मासिक पाळीच्या रजा वेगवेगळ्या नावाने दिल्या जातात.
SL/KA/SL
15 Jan. 2023