मुंबईत धावली पहिली Underwater Metro!

 मुंबईत धावली पहिली Underwater Metro!

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) माध्यमातून काम सुरु असलेल्या कुलाबा – वांद्रे – सीप्झ मार्गावरील मेट्रोचा एक टप्पा 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करुन सुरु करण्यात आला. बीकेसी मेट्रो स्थानक ते आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकादरम्यानचा टप्पा सुरु झाल्यानंतर आता पुढील टप्प्यातील सहा स्थानकांची यशस्वीपणे चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या चाचणीमध्ये मिठी नदीखालील टप्प्यातही मेट्रोने सुरक्षित प्रवास केला आहे. या चाचणीचा म्हणजेच मिठी नदी खालून मेट्रो धावत असल्याचा व्हिडीओ मेट्रोच्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे.

मेट्रो ‘अ‍ॅक्वा लाइन 3’वरील मिठी नदीच्या खालून जाणाऱ्या मार्गावर चाचणी पूर्ण करण्यात आल्याचा व्हिडीओ मुंबई मेट्रो 3 (@MumbaiMetro3) या हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा टप्पा धारावी ते आचार्य अत्रे चौक या स्थानकांदरम्यानचा असून या टप्प्याचं एकूण अंतर 9.77 किलोमीटर इतकं आहे. या अंतरामध्ये एकूण सहा स्थानकांवर चाचणी घेण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणी आणि सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर मार्च 2025 पर्यंत हा मार्ग सर्व सामान्यांसाठी खुला होणार आहे.

SL/ML/SL

26 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *