डिसेंबरमध्ये होणार गगनयानाचे पहिले चाचणी उड्डाण

श्रीहरीकोटा, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO) येत्या डिसेंबरमध्ये आपल्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेची पहिली चाचणी उड्डाण करणार आहे. यामध्ये कोणत्याही मनुष्याला पाठवले जाणार नाही. या मोहिमेच्या दुसऱ्या फ्लाइटमध्ये व्योम मित्र रोबोट तर तिसऱ्या फ्लाइटमध्ये चार अंतराळवीर पाठवले जाणार आहेत. इस्रोने अद्याप दुसऱ्या आणि तिसऱ्या उड्डाणाची वेळ जाहीर केलेली नाही.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले – मिशनच्या रॉकेटचे हार्डवेअर श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये पोहोचले आहे. त्याचवेळी, त्रिवेंद्रममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये क्रू मॉड्यूलवर काम सुरू आहे. नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
गगनयानची मानवयुक्त मोहीम 3 दिवसांसाठी असेल, ज्या अंतर्गत अंतराळवीरांची एक टीम पृथ्वीच्या 400 किमी वरच्या कक्षेत पाठवली जाईल. यानंतर, क्रू मॉड्यूल (ज्यामध्ये अंतराळवीर बसतात) समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर भारत या मोहिमेत यशस्वी झाला तर असे करणारा तो चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाने ही कामगिरी केली आहे.
भारत 23 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस (NSD) साजरा करेल. गेल्या वर्षी याच दिवशी इस्रोचे चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले होते. देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील लोकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी केले आहे.
SL/ML/SL
17 August 2024