मुंबई महानगरात सुरू झाले पहिले हवेतील रेस्टॉरंट
ठाणे दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोवा, नोएडा आणि पुण्यात स्काय डायनिंग हॉटेल सुरु झाल्या नंतर आता मुंबईजवळ ठाण्यात पहिल्यांदाच काल पासून स्काय डायनिंग हॉटेल भिवंडीत सुरु झाले आहे.
या स्काय डायनिंग हॉटेलचा थरार आता मुंबई, ठाण्यातल्या नागरिकांना घेता येणार आहे, 120 फूट उंच आणि 360 डिग्री मध्ये फिरणाऱ्या या हॉटेल मध्ये बसण्याची व्यवस्था 180 डिग्री मध्ये फिरणारी आहे,हा साहसी अनुभव आता लोकांना येथे घेता येणार आहे.
या मध्ये वीस लोकांना एकाच वेळी हवे मध्ये तरंगत जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे,संपूर्ण सुरक्षित असलेल्या या हॉटेलचे नाव “साया ग्रँड रिसॉर्ट ” Saya Grand Resort असे असून,जयंत पाटील यांच्या मालकीचे हे लक्झरी 4 स्टार रिसॉर्ट आहे, मुबंई नाशिक हायवे येथील अंजूर गावात हे रिसॉर्ट आहे.
माजिवडा नाका येथून आपण पंधरा मिनिटात येथे पोहचू शकतो डान्स, मस्ती, गाणी, सेल्फी आणि अनलिमिटेड फूड ने परिपूर्ण असे हे रिसॉर्ट आहे, या मध्ये कालपासून सुरु झालेल्या या स्काय डायनिंग हॉटेलचे उदघाटन केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले.
ML/KA/SL
21 Nov. 2022