पुण्यातील पहिल्या ‘पिकलबॉल’ स्पर्धेस प्रारंभ

पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगामध्ये झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या ‘पिकलबॉल’ या खेळाची पुण्यातील पहिली स्पर्धा १४ आणि १५ ऑक्टोबर २०२३ रोजी ठाकरे पिकलबॉल अकॅडमी ,’क्रिकफिटनेट अकॅडमी’, थेरगाव येथे आयोजित करण्यात आली असून आज सकाळी तिचा प्रारंभ झाला . ग्लायडर्झ आणि अनेक कंपन्यांच्या सहकार्याने ही टूर्नामेंट होत आहे.
‘ग्लायडर्झ स्पोर्ट्स इक्विपमेंट प्रा. लि.’च्या प्रमोटर अपूर्वा कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित सत्तू यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.वेगवेगळ्या वयोगटात महिला आणि पुरुषांची ही स्पर्धा होत असून त्यात डबल,मिक्स डबल असे गट आहेत.५० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळात अंतिम सामने होणार आहेत.
ग्लायडर्झ ही भारतामध्ये पिकल बॉल निर्मिती करणारी एकमेव कंपनी आहे.जास्त टिकणारा आणि उसळणारा पिकल बॉल या स्पर्धेसाठी आवश्यक असतो.
जागतिक दर्जाच्या मानकांनुसार तो तयार केला जातो.त्यासाठी उच्च दर्जाची सामग्री वापरली जाते.
पिकल बॉल या खेळाने अमेरिकेत लोकप्रियता गाठली असून भारतातही तो लोकप्रिय होऊ लागला आहे.टेनिस,बॅडमिंटन प्रमाणे आणि पिंगपॉंग प्रमाणे लोकप्रियता लाभत आहे.सर्व वयोगटात हा खेळ खेळता येतो.या खेळाचे नियम सोपे आहेत,असे संयोजकांनी सांगितले. The first ‘pickleball’ tournament in Pune has started
ML/KA/PGB
14 Oct 2023