बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२६ मध्ये सुरू
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
मुंबई अहमदाबाद दरम्यान देशातील पहिला बुलेट प्रकल्प उभारणीचं काम वेगाने सुरू आहे.. या प्रकल्पाचा गुजरातमधील बिलिमोरा ते सूरत दरम्यानचा पहिला टप्पा ऑगस्ट २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन दिली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाची झलक दाखवण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ते म्हणाले की २१ नोव्हेंबरपर्यंत बुलेट ट्रेन प्कल्पाच्या २५१.४० किलोमीटर अंतराचे पिलर बनवण्यात आले आहेत. १०३.२४ किलोमीटरचं सुपर स्ट्रक्चर देखील तयार आहे. हा टप्पा ५० किलोमीटरचा आहे.
अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबामधील वलसाड, नवसारी, सूरत, बडोदरा, आनंद जिल्ह्यातील पूर्ण करण्यात आलेल्या पुलांची कामं दाखवली आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट प्रकल्पांतर्गत गुजरातमध्ये वलसाड जिल्ह्यात पार, औरंगा, नवसारीत पूर्णा, मिंधोला, अंबिका आणि वेंगानिया नदीवर पूल बनवण्यात आले आहेत.
SL/KA/SL
30 Nov. 2023