टाईम्स स्क्वेअरवर पोस्टर झळकणारा पहिला मराठी चित्रपट

 टाईम्स स्क्वेअरवर पोस्टर झळकणारा पहिला मराठी चित्रपट

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवराज अष्टकामधून महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रेक्षकांच्या समोर मांडणारे लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या सोबतच ‘शिवरायांचा छावा’चं पहिलं मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.विशेष बाब म्हणजे चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी अभिनीत ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आता न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहे. टाईम्स स्क्वेअरवर मोशन पोस्टर रिलीज़ करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची गाथा सांगणारा हा ‘शिवरायांचा छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लेखक-दिग्दर्शक-निर्माते दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झाला.या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ला रिलीज होणार आहे.

या चित्रपटात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर, तर जिजाऊसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हे कलाकर झळकणार आहेत. विक्रम गायकवाड, अभिजीत श्वेतचंद्र, भूषण विनतरे, अमित देशमुख हे कलाकारही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

SL/KA/SL

12 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *