महाराष्ट्रात येथे उभारले जाणारा देशातील पहिले इंटरफेरोमीटर
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये महाराष्ट्रासाठी खास बाब म्हणजे हिंगोली येथील LIGO इंडिया या भारतातील पहिले इंटरफेरोमीटर- लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (LIGO) चे पायाभरणी करण्यात आली.
काय आहे LIGO प्रकल्प
LIGO-इंडिया हा सर्वात महत्वाचा प्रकल्प हिंगोली, महाराष्ट्रात बांधला जाणार आहे. हे जगातील काही लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (LIGO) पैकी एक असेल. हे चार किलोमीटर लांबीचे अत्यंत संवेदनशील इंटरफेरोमीटर आहे, जे कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांमधून निघणाऱ्या गुरुत्वाकर्षण लहरी ओळखण्यास सक्षम आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाची सुरुवात 1999 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती. भारतातील शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी अटल बिहारी यांनी हा विशेष दिवस साजरा केला होता. 11 मे ही तारीख निवडण्यात आली कारण या दिवशी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी केली होती.
SL/KA/SL
11 May 2023