पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

 पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबई दि.13( एम एमसी न्यूज नेटवर्क ) : मुंबईकरांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे आज बेस्टच्या कुलाबा आगारात पूजन करण्यात आले . येत्या आठवड्याभरात ही बस मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसेल असा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला.
हैदराबाद येथील स्विच कंपनीने तयार केलेली ही इलेक्ट्रिक डबल डेकर बस 2022 मध्ये तयार करण्यात आली होती .मात्र पुण्यातील ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या कंपनीकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळालं नव्हतं.त्यामुळे या बसचा मुक्काम लांबणीवर पडला होता.आता हे फिटनेस सर्टिफिकेट मिळालं आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात ही बस मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसेल.येत्या 8 दिवसांत आणखी 4 डबल डेकर बसेस ताफ्यात येणार आहेत. या बसेस आठवड्याभरात प्रवाशांच्या सेवेत सामिल केल्या जातील. येत्या काही दिवसात 200 बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत.

या बसची खास वैशिष्ट्ये

ही बस 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 100 किमीपर्यंत धावू शकते, तर संपूर्ण चार्जसाठी 80 मिनिटं लागतात. या बसची बॉड अॅल्युमिनिअमपासून बनलेली आहे. या एका बसची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे. यातून जवळपास 80 प्रवासी प्रवास करू शकतात. संपूर्णपणे वातानुकूलित, ऐसपैस आसनव्यस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था, बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असणार आहे. तीन तासांच्या सिंगल चार्जमध्ये 120 किमी. प्रवासाची क्षमता ही या डबल डेकरची खास वैशिष्ट्ये आहेत.

बस कुठल्या मार्गांवर धावणार

ही बेस्ट सेवा वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक या मार्गांवर धावणार आहे. कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गावर सुरुवातीला ही बस धावेल. या एसी बसचं भाडे कमीत कमी 5 किलोमीटरपर्यंत 6 रुपये असणार आहे.

या कंपनीला बस तयार करण्याची ऑर्डर

अशोक लेयलँडच्या स्विच कंपनीला बेस्टकडून २०० एसी डबल डेकर बस तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. कंपनी ही ऑर्डर एक ते दीड वर्षात पूर्ण करेल. सध्या बेस्टच्या ताफ्तात डिझेलवर चालणाऱ्या ४५ जुन्या डबल डेकर बसेस आहेत, ज्या जून २०२३ पर्यंत सर्विसबाहेर होतील. या सर्व ४५ बसेस काढून त्याजागी जून २०२३ पर्यंत नव्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस चालवल्या जातील. 2026 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात सर्व इलेक्ट्रिक बसेस असतील. या इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.

SW/KA/SL

13 Feb. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *