देशातील पहिली AI शाळा या राज्यात सुरु

 देशातील पहिली AI शाळा या राज्यात सुरु

AI

थिरुवनंतपुरम, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सर्वत्र AI ची चर्चा सुरू असताना आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिल्या AI शाळेचे उद्घाटन केले. शांतीगिरी विद्याभवनमध्ये ही शाळा उघडण्यात आली आहे. ही पहिली AI शाळा इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही AI शाळा iLearning Engine (ILE) USA आणि Vedic eSchool यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. एआय टूल्सच्या मदतीने, अभ्यासक्रम डिझाइन, वैयक्तिकृत शिक्षण, मूल्यांकन आणि शाळेतील विद्यार्थी समर्थन यांसह शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये त्याचा वापर केला जाईल. या AI शाळेचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे AI द्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यास मदत केली जाते. त्यांना प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी मार्गदर्शन मिळते, जेणेकरून विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतील.

शाळेच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या शाळेत पारंपारिक अध्यापन पद्धती बरोबरच, विद्यार्थ्यांना एआयच्या (AI) मदतीने प्रगत साधने आणि संसाधने दिली जातील, ज्याच्या मदतीने विद्यार्थी भविष्यातील आव्हानांसाठी तयार होतील. AI स्कूल हे जगातील सर्वात प्रगत शैक्षणिक प्लॅटफॉर्म iLearning Engines (ILE) USA ने Vedhik eSchool च्या सहकार्याने डिझाईन केलेले आहे. विद्यार्थ्यांना शिकण्याची ही नवीन पद्धत खरोखर चांगले शिक्षण देणार आहे आणि मुले खूप काही शिकणार आहेत असेही अधिकारी म्हणाले.

या शाळेत मुलांना विविध स्तरांची चाचणी, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मरण तंत्र याविषयी माहिती दिली जाते.तसेच पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासही शिकवला जातो. मुलाखत कौशल्ये, ग्रूप डिस्कशन, गणित आणि लेखन कौशल्ये, शिष्टाचारात सुधारणा, इंग्रजी आणि इमोशनल वेल बिंग याबद्दलही माहिती दिली जाते. शालेय परीक्षांव्यतिरिक्त, मुलांना JEE, NEET, CUET, CLAT, GMAT आणि IELTS सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील तयार केले जाते. जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेसाठी तयार होतील.

ML/KA/SL

26 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *