प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटांने केली १.६२ कोटींची कमाई
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओम राऊत दिग्दर्शित आणि प्रभास-क्रिती सेनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहे. प्रदर्शनापूर्वीच आगावू तिकीट बुकींगमुळे कोटींची कमाई झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. येत्या 16 जून हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. रविवार (11 जून) पासून चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाची 36,000 हून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. हे आकडे रविवारी रात्री 11.30 वाजेपर्यंतचे आहेत. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून 1.35 कोटींची कमाई झाली आहे.
तेलुगु व्हर्जनने अॅडव्हान्स बुकिंगमधून 20 लाखांचे कलेक्शन केले आहे. तर तमिळ आणि मल्याळम व्हर्जनमधून फारशी कमाई झालेली नाही. एकंदरीत पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून 1.62 कोटींची कमाई झाली आहे.
‘आदिपुरुष’च्या अॅडव्हान्स बुकिंगला 11 जूनपासून सुरुवात झाली आहे. भूषण कुमार निर्मित आणि ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसची मिळून एकुण 36,000 तिकिटे विकली गेली आहेत. सहा तासांत चित्रपटाच्या 18 हजार तिकिटांची विक्री झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट भारतात तब्बल 6200 स्क्रीन्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यापैकी 4000 स्क्रीन्सवर हा चित्रपट हिंदी भाषेत दाखवला जाईल.
सुरुवातील VFX मधील त्रुटींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्ा प्रदर्शनपूर्व प्रतिसाद पाहता बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई करणार असे संकेत दिसत आहेत.
SL/KA/SL
13 June 2023