ऑस्करमध्ये ‘अनोरा’ चित्रपटाला मिळाले सर्वाधिक पुरस्कार

ऑस्कर पुरस्कारमध्ये ‘अनोरा’ चित्रपटाने बाजी मारली आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांवर आधारित ‘अनोरा’ चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाला पाच विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – माईकी मॅडिसन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शॉन बेकर, सर्वोत्कृष्ट संकलन – शॉन बेकर, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले – शॉन बेकर, असे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.