तुळजाभवानीच्या मंदिरात घटस्थापनेने उत्सवाला सुरुवात

धाराशिव , दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):
महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवीच्या, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने झाली. धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. संबळाच्या कडकडाटात तुतारीच्या निनादात आणि आई राजा उदो उदो च्या जयघोषात घटस्थापनाचा विधी पार पडला.
यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्यासह तीनही पुजारी मंडळाचे पदाधिकारी पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .पुढील नऊ दिवस हा नवरात्र उत्सव चालणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
ML/KA/PGB
15 Oct 2023