कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव भक्तीभावाने संपन्न

 कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव भक्तीभावाने संपन्न

सिंधुदुर्ग, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव भक्तिभावाने संपन्न झाला. होळीनिमित्त होणारा हुडोत्सव भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता . महाराष्ट्रात पंढरपूर आणि कुणकेरी या दोनच ठिकाणी होणाऱ्या हुडोत्सवात अनेक लोककला आणि लोकनृत्य सादर केली जातात. हुड्यावर चढणाऱ्या संचरीत अवसरांचा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा , कर्नाटक भागातील हजारो भाविक यावेळी उपस्थित होते.

यावेळी पारंपारिक घोडे मोडणीचा खेळ आणि लुटुपुटीची लढाई देखील सादर करण्यात आली. ११० फुटी हुड्याच्या वरील टोकाला पोहोचलेल्या संचारी अवसरांवर दगड मारण्याच्या पारंपारिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता झाली. कुणकेरी गावच्या या महाउत्सवामुळे गावात मोठे उत्साहाचे वातावरण होते . हुडोत्सवाचे पोलीस प्रशासनासह स्थानिक देवस्थान कमिटी , ग्रामपंचायत आणि कुणकेरी ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. The famous Hoodotsav of Kunkeri is full of devotion

ML/ML/PGB
31 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *