The Family Man’ season 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, दि. २८ : “द फॅमिली मॅन” या हिट स्पाय अॅक्शन-थ्रिलर मालिकेचा बहुप्रतिक्षित तिसरा सीझन २१ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल, असे स्ट्रीमरने आज जाहीर केले. या सिरीज चा पहिला सीजन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता तर दुसरा सीजन 2021 मध्ये प्राईम व्हिडिओवर रिलीज झाला .या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला .गेल्या चार वर्षांपासून चाहत्यांना द फॅमिली मॅन च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती आणि आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपलीय . प्राईम व्हिडिओने सोशल मीडियावर काही वेळापूर्वीच ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे . ‘ ले लाडले, हो गया श्रीकांत का कमबॅक ‘ असं लिहीत एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे .
या सीझनमध्ये दोन नवीन कलाकार जयदीप अहलावत आणि निम्रत कौर यांची एंट्री होत आहे. दोघेही नकारात्मक भूमिकांमध्ये दिसणार आहेत. कथा लेखन राज, डीके आणि सुमन कुमार यांनी केलं असून, संवाद लेखन सुमित अरोरा यांचं आहे. तिसऱ्या सीझनचं दिग्दर्शन राज आणि डीके यांनीच केलं असून, तुषार सेठ आणि सुमन कुमार यांचाही यात सहभाग आहे.
SL/ML/SL