बायकोच्या जाचाला कंटाळून इंजिनिअर नवऱ्याचे टोकाचे पाऊल, २४ पानी चिठ्ठी लिहून केले अनेक खुलासे
बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या अतुल सुभाष या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अतुल सुभाष बेंगळुरु येथील महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)मध्ये डीडीएम पदावर कार्यरत होते. अतुल यांनी आत्महत्या करण्याआधी २४ पानी सुसाईड नोट लिहीली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांवर छळ केल्याचे आरोप केले आहेत. बायको ३ कोटींची मागणी करत होती. सुप्रीम कोर्टात सुनावणी सूरू असताना या आत्महत्या केलेल्या माणसाने जज ला सांगितले “माझी एवढी ऐपत नाही, मला आत्महत्या करावी लागेल” तेव्हा त्याची बायको म्हणाली “कर मग” तेव्हा लेडी जज हसल्या. अशाप्रकारच्या अनेक घटना त्यानी सुसाईड नोटमध्ये लिहिल्या आहेत. या प्रकरणी अतुल सुभाष यांनी एक व्हिडिओ बनवला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडीओत आपल्याला न्याय देण्याची मागणी करत पत्नीविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, असंही म्हटलं आहे. आता पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे