रंगपंचमीचा उत्साह : अवघा रंग एक झाला
सोलापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूर शहरातील यमाई ट्रॅकवर आज सकाळी रंगपंचमीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. यावेळी तरुण बालकांसह अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. तर कृष्णपूजनाने रंगपंचमीला सुरुवात झाली.
संपूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करून यावेळी रंगपंचमी खेळण्यात आली. डिजेच्या तालावर मोठ्या प्रमाणावर तरुणाई थिरकताना दिसली. पूर्णपणे पर्यावरण पूरक साजऱ्या झालेल्या रंगपंचमीचा सर्वत्र चर्चा आहे.
ML/KA/SL
12 March 2023