विठ्ठलाच्या नित्य महापूजेने एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात…
सोलापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चैत्र शुद्ध एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठलाची नित्य महापूजा पहाटे करण्यात आली. मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते पूजा झाली आणि यानंतर पंढरपुरात एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याची सुरुवात झाली.
दही दूध आणि पंचामृतने विठ्ठलास अभिषेक घालत असताना विठ्ठलाचे रुप हे ‘ राजस सुकुमार मदनाचा पुतळा ‘ या संत उक्ती प्रमाणे लोभस दिसत होते. मराठी वर्षातील पहिलीच एकादशी आणि पहिलीच वारी म्हणून चैत्री यात्रेकडे पाहिले जाते. या यात्रेसाठी राज्यातील बहुतांश भागातील वारकरी पंढरपुरात आले आहेत.
ML/ML/SL
19 April 2024