देशांतर्गत शेअर बाजारात सलग पाच दिवस तेजी
मुंबई, दि. २९, जितेश सावंत (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील आठवड्यातील नकारात्मकता बाजूला सारून 28 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात बाजाराने चांगलीच बढत घेतली.संपूर्ण आठवडा बाजारात सकारात्मकता टिकून राहिली.निफ्टी व सेन्सेक्सने अनुक्रमे 18000 व 61000 चे टप्पे पार केले.काही कंपन्यांचे चांगले त्रैमासिक निकाल कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमता व विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजरात मोठ्या प्रमाणावर तेजी झाली.
सेन्सेक्स आणि निफ्टीने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून या महिन्यात सर्वाधिक वाढ नोंदवली.
पुढील आठवड्यात US FED ची महत्वपूर्ण बैठक आहेया बैठकीवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहील व बाजाराची पुढील दिशा ठरेल.
शुक्रवारी अमेरिकन बाजारात मोठी वाढ झाली.
Technical view on nifty-बाजार ओव्हरबॉट झोन मध्ये आहे. शुक्रवारी निफ्टीने 18065 चा बंद भाव दिला.निफ्टी 18100-18134-18162-18201 हे टप्पे गाठेल पण बाजार ओव्हरबॉट असल्याने वरच्या स्तरावर नफावसुली होईल.निफ्टी साठी 17950-17883 हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे तोडल्यास घसरण वाढेल व निफ्टी 17842-17828-17797-17759-17722 हे स्तर गाठेल.
Volatility Index
इंडियाचा वोलॅटिलिटी इंडेक्स (Volatility Index) सध्या 11च्या खाली आहे म्हणजेच ऐतिहासिक पातळीच्या जवळ(historical lows) आहे.लोअर VIX चा अर्थ असा होतो की, भविष्यात होणार्या कोणत्याही मोठ्या इव्हेंटमुळे बाजाराला अल्पावधीसाठी कोणत्याही महत्त्वपूर्ण जोखमीची भीती नाही. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बाजार बंद राहतील .
सेन्सेक्स पुन्हा 60 हजार
मागील आठवड्यातील कमकुवतपणा बाजूला सारून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार चांगलाच वधारला. दिवसभरात आणि वीकेंडला काही कंपन्यांचे चांगले त्रैमासिक निकाल आणि कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई आल्याने सेन्सेक्स 400 अंकातून अधिक वाढला.गेल्या आठवड्यात, माहिती तंत्रज्ञान फर्मच्या निराशाजनक कमाईनंतर बाजारातील गुंतवणूकदार सावध होते.परंतू सोमवारी बैंक, फाइनेंशियल, आईटी, मेटल, रियल्टी, एफएमसीजी ह्या क्षेत्रात खरेदी झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 410.04अंकांनी वधारून 60,056.10 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 119.35 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,743.40 चा बंद दिला. Sensex reclaims 60k-mark
मंगळवारी बाजारात तेजी
कमकुवत जागतिक संकेत असतानाही भारतीय शेअर बाजारात मंगळवारी तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारानी काही निवडक मेटल,ऑइल आणि गॅस व फायन्यांशीअल समभागांमध्ये खरेदी केली.अजूनही बाजारासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये व्याजदर वाढतच राहतील व यामुळे भविष्यात जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मंदी येऊ शकेल आणि विकासाला फटका बसू शकेल ही मोठी चिंतेची बाब आहे म्हणून गुंतवणूकदार सावध पवित्र्यात आहेत.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 74.61 अंकांनी वधारून 60,130.71 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 26 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,769.30 चा बंद दिला. Sensex and Nifty closed higher for the second straight session on Tuesday.
निफ्टी 17,800 च्या वर
जागतिक बाजारातील कमजोरीमुळे बाजाराची सुरुवात सपाट झाली.बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत राहिला परंतु शेवटच्या तासातील खरेदीने बाजार दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला.पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया आणि एचसीएल टेक हे सेन्सेक्सवरील टॉप 5 वाढणारे समभाग ठरले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 169.87 अंकांनी वधारून 60,300.58 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 44.30 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,813.60 चा बंद दिला. Nifty above 17,800
निफ्टी पुन्हा 17,900 च्या वर
गुरुवारी बाजाराने मागील सत्रातील वाढीचा सिलसिला सुरु ठेवला. बाजाराची सुरुवात काहीशी सपाट झाली परंतू दुपारनंतर झालेल्या खरेदी मुळे निर्देशांक दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाले. आयटी निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला.याशिवाय बँक, वित्तीय, वाहन, धातू आणि रिअल्टी निर्देशांकही हिरव्या रंगात बंद झाले.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 348.80 अंकांनी वधारून 60,649.38 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 101.40अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,915 चा बंद दिला. Nifty back above 17,900 .
शुक्रवारी बाजारात जोरदार खरेदी
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व मे सिरीज च्या पहिल्या दिवशी सपाट सुरुवातीनंतर दुपारी, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि ITC समभागांमध्ये तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात वाढ झाली.भारतीय इक्विटी बेंचमार्क 28 एप्रिल रोजी दोन महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 463.06 अंकांनी वधारून 61,112.44 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 150 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,065 चा बंद दिला. Friday cheer for market.
(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)
jiteshsawant33@gmail.com