शेतीसिंचनाचे कठीण काम,मनुष्यबळा शिवाय शक्य…

वाशीम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती आर्थिक दृष्ट्या फायद्याची होण्याकरिता शेती ओलीताखाली असावी लागते. मात्र आज मनुष्यबळ व इतर संसाधना अभावी पिकांना ओलित करण्याचे काम कठीण होऊन बसले आहे.

गहू, हरभरा यासारख्या पारंपरिक पिकांना ठिबक द्वारे पाणी देणे शक्य नसून तुषार सिंचन करायचे झाल्यास ठराविक वेळे नंतर तुषारसंच एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवावे लागतात, रात्री अपरात्री शेतकऱ्यांना हे काम करावे लागते. या जीवघेण्या प्रकारातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी , याकरिता वाशीम जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने मनुष्यबळा शिवाय शेतीला ओलित करण्याचे तंत्र विकसित केले आहे. याचे साह्याने शेतकऱ्यांना कुठल्याही अंगमेहनती शिवाय शेतीला ओलित करणे शक्य होणार आहे.

पूर्वी शेतकरी मोकळ्या पाटाने पाणी देत होते नंतर तुषार आणि ठिबक सिंचनाचे पर्याय उपलब्ध झाले. मात्र ठिबक सिंचनाने गहू हरभऱ्या सारख्या पारंपरिक पिकांना पाणी देणे शक्य होत नाही तर तुषार सिंचनाने पाणी देणे प्रचंड मेहनतीचे व जोखमीचे काम आहे. कारण दर तीन तासाला पाईप उचलावे लागतात. त्यासाठी पिकात जावे लागते, पीक मोठे झालेले असल्यास पिकाची नासधूस होते. रात्री बेरात्री पाईप उचलताना साप, विंचू चावण्याचा धोकाही असतो.

शिवाय यासाठी मनुष्यबळही लागते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून वाशिमच्या आशिष कडू या तरुण संशोधकाने एक भन्नाट उपाय शोधलाय,
रोटेटिंग आर्म इरिगेशन सिस्टीम, या सिस्टम मुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणं सोपे होणार आहे.

आशिष कडू या युवा शेतकऱ्याने आपल्या शेताच्या मधोमध एक पोल उभा केलाय आणि त्यांला साधारण 50 फूट आडवे अँगल लावले याच अँगलला रेनपाईप जोडलाय त्यातून पिकांना पाणी देता येतं, पिकांवर फवारणी करता येते, आणि जनांवर,पक्षी हकलण्याचं कामही होतं. हे आडवे अँगल 360 डिग्री मध्ये फिरतात विशेष म्हणजे त्याला फिरवण्यासाठी कोणत्याही ऊर्जेची गरज नाही. यासाठी आशिष यांनी पाण्याच्या वजनाचा वापर केलाय.

शेतकऱ्यांने एकदा ही सिस्टम बसवली की यासाठी कोणताही खर्च येणार नाही आणि पुढचे तीसएक वर्ष हे काम करेल असा आशिष यांचा दावा आहे. आशिष गेल्या अनेक वर्षांपासून वेवेगळे प्रयोग करत असतात. त्यांनी या आधी आतील वातावरण थंड ठेवणारी काच, अतिशय कमी दाबाचे पाणी वापरून त्यापासून विद्युत ऊर्जा बनवणारे यंत्र. जे विद्यापीठाच्या टीम ने परीक्षण करून काम करत असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

फक्त पाचशे वॅट उर्जेवर चालू शकणारे संपूर्ण ऑटोमॅटिक 200 अंड्यांची क्षमता असलेले अंडी उबवणी मशीन, खराब झालेले फळे भाजीपाला यांच्यापासून ‘बॅच सोजर लाय’ जातीच्या अळ्यांचा उपयोग करून शेती उपयोगी जैविक औषध असे विविध प्रयोग केलेले आहेत.

आशिष कडू यांचं रोटेटिंग आर्म इरिगेशन सिस्टीमच्या पेटंट साठी अर्ज केलेला असून लवकरत ते त्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचं हे संशोधन नक्कीच शेतकऱ्यांसाठी मोठं लाभदायी ठरणार आहे.

ML/KA/SL
20 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *