महायुती आणि महाविकास आघाडीत सुमारे एक कोटी मतांचा फरक

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या निवडणूकीच्या आज जाहीर झालेल्या निकालात महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण राज्यातील महायुती आणि महा विकास आघाडीच्या मतांची गोळाबेरीज मांडली असता युती आणि आघाडीच्या मतांमध्ये सुमारे १ कोटी मतांचा फरक असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवानुसार या दोन्ही विरोधकांच्या मतांमधील हा लक्षणीय फरक पुढे मांडला आहे.
महायुतीची मते (3 प्रमुख पक्ष)
3,07,76,400
महाविकास आधाडीची (3 मुख्य पक्ष) मते
2,14,38,600
मतांमधील फरक
-93,37,800
महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमधील एकूण फरक नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत सुमारे 7.14 लाख एवढा होता.
लोकसभा 2024 चे मताधिक्य
महा विकास आघाडी – 2,55,26,700
महायुती -2,48,12,700
महाविकास आघाडीने सुमारे अंदाजे 40 लाख मते गमावली असून ती महायुताच्या पदरात पडली आहेत आणि वाढलेल्या मतांच्या टक्केवारीमुळे त्यांना सुमारे 20 लाख अधिकची अधिक मते मिळाल्याचे प्राथमिक चित्र दिसून येत आहे.
SL/ML/SL
23 Nov. 2024