परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह

 परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी परभणीच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांशी आपण दुरध्वनी द्वारे संपर्क साधुन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे.आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या मागचा सुत्रधार शोधण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आपण करणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती काढुन झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने तीव्र आंदोलन केले.रास्ता रोको केला,रेल रोको केला.संविधानाचा अवमान करणे हा अत्यंत गंभीर आणि राष्ट्रद्रोही गुन्हा आहे.या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत.या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे.आंबेडकरी जनतेच्या भावना तीव आहेत.निषेध आंदोलनातुन त्या भावना व्यक्त झालेल्या आहेत.त्यामुळे आता आंबेडकरी जनतेने या प्रकरणी संयम बाळगुन शांतता राखण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

SW/ML/SL

11 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *