गायरान जमिनी बाबतचा निर्णय गरिबाला न्याय देण्यासाठीच
नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या सद्सद्विवेक बुध्दी नुसार , यापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आणि सादर करण्यात आलेल्या पुराव्यानुसारच आपण आपल्याला प्राप्त अधिकारानुसार गायरान जमिनीचा निर्णय आपण त्यावेळी घेतला असा खुलासा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत केला. The decision regarding Graze land is to give justice to the poor
विरोधी पक्षाच्या वतीने सभागृहात यावर मुद्दा उपस्थित करून प्रचंड गदारोळ घालण्यात आला होता, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते, मात्र कालपासून हा विषयच सभागृहातून गायब झाला होता, विरोधकांनी एकही शब्द याबाबत सभागृहात नंतर काढलेला नाही.
आपण महसूल राज्यमंत्री असताना घेतलेल्या या निर्णयावर उच्च न्यायालयात जो निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य असेल असं सत्तार खुलाशात म्हणाले, याप्रकरणी सुनावणी दरम्यान आपल्यासमोर आवश्यक पुरावे सादर करण्यात आले होते, यापूर्वी न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती यांना अशा गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी आदेश दिलेले आहेत, तसेच दिवाणी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल असल्याची बाब त्यावेळी अवगत करून देण्यात आली नव्हती असेही सत्तार यांनी आपल्या खुलाशात सांगितलं.
ML/KA/SL
28 Dec. 2022